सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी सीए बिपीन शहा

रत्नागिरी : ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या रत्नागिरी शाखेची सन २०२०-२१साठीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार अध्यक्षपदी सीए बिपीन शहा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सीए आनंद पंडित, तर सेक्रेटरी म्हणून सीए प्रसाद आचरेकर, खजिनदार म्हणून सीए शशिकांत काळे यांची निवड करण्यात आली.

सीए इन्स्टिट्यूटच्या गणपतीपुळे, मालगुंड येथे नुकत्याच झालेल्या शिबिरात मावळते अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्ष सीए बिपीन शहा यांच्याकडे सोपवली. सीए राजशेखर यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.

सन २०१७मध्ये स्थापन झालेल्या रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून सीए व व विद्यार्थ्यांकरिता विविध चर्चासत्रे, अभ्यासवर्ग घेतले जातात. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून या वर्षी सर्टिफिकेट कोर्सेस, विद्यार्थ्यांकरिता परीक्षांसाठी मार्गदर्शनपर वर्ग, करिअर कौन्सिलिंग सेमिनार घेण्याचा मानस नूतन अध्यक्ष सीए बिपीन शहा यांनी व्यक्त केला. शाखेची स्वतःची वेबसाइट व ई-न्यूजपेपरसुद्धा सुरू करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

(वरील फोटोत : ‘सीए इन्स्टिट्यूट’च्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए बिपीन शहा यांचे अभिनंदन करताना मावळते अध्यक्ष सीए अँथनी राजशेखर. सोबत कार्यकारिणी सदस्य.)

Leave a Reply