सध्या सर्वत्र फक्त ‘करोना’ आणि ‘करोना’ एवढंच ऐकू येतं आहे, तेच वाचायला मिळतं आहे, दिसतं आहे… त्यामुळे प्रत्येकाच्याच मनात भीतीचं वातावरण आहे. शिवाय सगळे व्यवहार बंद असल्याने ‘पुढे काय होणार’ याचं टेन्शनही आहे; पण या परिस्थितीत मनाचा तोल ढळू न देता मानसिक आरोग्य उत्तम राखण्याची गरज आहे. ते कसं राखायचं याचं मार्गदर्शन ख्यातनाम मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी एका छोट्या व्हिडिओतून केलं आहे. त्यांचे शब्द सध्याच्या कठीण परिस्थितीत प्रत्येकाच्या मनाला उभारी देतील आणि संकटातून बाहेर पडण्याची मानसिक शक्ती देतील. तो व्हिडिओ खाली देत आहोत.
(व्हिडिओ दिसत नसल्यास कृपया येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media