रत्नागिरीतील रुग्णसंख्या ७४वर; आज नवे २२ ‘पॉझिटिव्ह’

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आज (१३ मे) एकूण २२ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७४वर पोहोचली आहे. आज आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील सात, मंडणगडातील ११, तर दापोलीतील चार रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरीत सापडलेल्या सात रुग्णांपैकी चार महिला आणि तीन पुरुष, मंडणगडमध्ये चार महिला आणि सात पुरुष असून, दापोलीतील सर्व चारही रुग्ण पुरुष आहेत. या सगळ्यांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे तीन बळी गेले असून, पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याचाच अर्थ ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यापासून मुंबईतून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.

One comment

  1. मुंबईतून आता कोकणात येणाऱ्या सर्व माणसांना कोकणात येऊ देऊ नये, कारण रत्नागिरीमध्ये गेला दीड महिना कुठलाच रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईतून येणाऱ्या सर्व लोकांमुळे कोकणात कोरोनाचे रुग्ण हे खूप जास्त प्रमाणात वाढायला लागले आहेत. गेला दीड महिना कोकवासीयांनी जे लॉकडाऊन शिस्तीत पाळले होते , ते आता वाया गेले असे दिसून येत आहे तरी आपल्या माननीय जिल्हाधिकारी मिश्रा साहेबांनी हे जे मुंबईतून येणारे लोक आहेत त्यांना कोकणात येऊ देऊ नये ही विनंती . जेणेकरून आता जो आकडा आहे तोच राहील आणि आपण तो आकडा कमी करण्याचा प्रयत्न करू व आपला रत्नागिरी जिल्हा Corona मुक्त करू .धन्यवाद

Leave a Reply