‘पडता शेअर बाजारही मिळवून देऊ शकतो नफा’

रत्नागिरी : ‘शेअर बाजार पडतो, तेव्हा सगळे शेअर पडत नसतात. त्यामुळे शेअर बाजार पडत असतानाही त्यातून चांगला नफा कमावणे शक्य आहे. नेमका अभ्यास, घडामोडींवर चौफेर लक्ष आणि त्याला योग्य तर्काची जोड असेल, तर शेअर बाजाराच्या आगामी वाटचालीचा जास्तीत जास्त अचूक अंदाज बांधता येऊ शकतो,’ असे प्रतिपादन शेअर बाजार या विषयावरील संशोधक प्रा. शौनक माईणकर यांनी केले.

शेअर बाजारविषयक प्रशिक्षण देणाऱ्या ‘ट्रेड एन्कोअर’ संस्थेचे संस्थापक प्रा. शौनक माईणकर यांनी ‘इज स्टॉक मार्केट प्रेडिक्शन ए मिथ’ या विषयावर १४ जून २०२० रोजी दोन मोफत वेबिनार आयोजित केले होते. एक वेबिनार मराठीतून, तर एक इंग्रजीतून झाला. या वेबिनारध्ये दोनशेहून अधिक जण सहभागी झाले होते. शेअर मार्केट ट्रेडिंग आणि संबंधित विषय पुण्यातील नामवंत कॉलेजमध्ये शिकवण्याचा, तसेच प्रत्यक्ष ट्रेडिंगचा प्रा. माईणकर यांना सुमारे दोन वर्षांचा अनुभव आहे.

‘शेअर बाजार हा गुंतवणुकीच्या पारंपरिक साधनांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक उत्पन्न देणारा पर्याय आहे; तो कोणालाही उत्पन्न मिळवून देऊ शकतो; मात्र त्यासाठी नेमक्या अभ्यासाची, निरीक्षणाची आणि योग्य तर्कांची जोड देणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील घडामोडींबद्दल माध्यमांमध्ये येणारे वार्तांकन बहुतेक वेळा नकारात्मक बाजूने केलेले असते. मात्र त्याची सकारात्मक बाजूही असते आणि ती अभ्यासातून आपल्या लक्षात येऊ शकते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स किंवा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हे निर्देशांक शेअर बाजारातील सगळ्या शेअर्सच्या वाटचालीचे प्रतिबिंब दाखवत नाहीत. बऱ्याचदा या निर्देशांकांची वाटचाल आघाडीच्या काही प्रमुख कंपन्यांच्या वाटचालीवर अवलंबून असते. म्हणूनच शेअर बाजार पडला असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा सर्वच कंपन्यांच्या शेअरची कामगिरी खराब झालेली आहे असा त्याचा अर्थ नसतो. शेअर बाजार वर जात असतो, तेव्हा उत्पन्न मिळते, हे सर्वांनाच माहिती आहे; पण अभ्यास असल्यास बाजाराच्या पडत्या काळातही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते,’ असे प्रा. माईणकर यांनी सांगितले. त्यांनी स्वतःचा या बाबतीतील अनुभवही शेअर केला.

शेअर बाजार हा उत्पन्नाचा स्रोत केव्हाही उपयोगी ठरू शकतो, हे सांगताना प्रा. माईणकर यांनी, लॉकडाउनच्या काळात इतर अनेक व्यवहार बंद पडले तरी शेअर बाजाराचे व्यवहार सुरूच होते, या बाबीकडे लक्ष वेधले.

शेअर बाजाराचे विविध कोर्सेस प्रा. माईणकर यांनी डिझाइन केले असून, त्यातील अॅडव्हान्स्ड कोर्सची पुढील बॅच १६ जून २०२०पासून सुरू होत आहे. त्याची माहिती सोबतच्या पत्रकात दिली आहे. करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला त्या वेळी एप्रिल महिन्यात प्रा. माईणकर यांनी ‘स्टॉक टॉक’ या नावाने हा १० दिवसांचा मोफत ऑनलाइन कोर्सही घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता प्रा. माईणकर यांच्या ‘ट्रेड एन्कोअर’ संस्थेतर्फे शेअर बाजाराशी संबंधित विविध कोर्स शिकू इच्छिणाऱ्याच्या सोयीच्या वेळेनुसार घेतले जातात. कोर्ससंबंधीची संपूर्ण माहिती वेबसाइटवर दिली आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. माईणकर यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप : https://wa.me/919405959454
वेबसाइट : https://www.tradeencore.com/


Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply