सिंधुदुर्गात करोना निदान प्रयोगशाळा सुरू; ॲक्टिव्ह रुग्णसंख्या रत्नागिरी – १०३, सिंधुदुर्ग ३९

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून आजपर्यंत (१९ जून) सहा जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४६५ झाली असून, तीन जणांना आज घरी सोडण्यात आले. सिंधुदुर्गातही आज तिघांना घरी सोडण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्गात करोना निदान प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज (१९ जून) रत्नागिरीतील समाजकल्याण भवनातील कोव्हिड केअर सेंटरमधून तीन रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३४६ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७४.४ टक्के आहे. सध्या रुग्णालयात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०३ असून, यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी एक दापोली बाजारपेठ, बोंडवली येथील दोन, गोळप येथील एक, निरुळ येथील एक आणि रत्नागिरीतील मच्छी मार्केटमधील एकाचा समावेश आहे.

ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन
जिल्ह्यात सध्या ५१ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १२ गावांमध्ये, गुहागर तालुक्यात १, खेड तालुक्यात ९ गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात १, दापोलीत ७ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ५, चिपळूण तालुक्यात १० गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात ५ आणि मंडणगडमधील एका गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात १८ जूनपर्यंत एकूण एक लाख ४२ हजार २८७ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ७० हजार १३३ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११४ झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३९ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५८ असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून एकूण एक लाख दोन हजार ३८३ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

प्रयोगशाळेचे उद्घाटन
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रेण्वीय निदान प्रयोगशाळेचे (करोना विषाणू निदान) उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
……………….

सिंधुदुर्गात आज (१६ जून) चार रुग्णांना बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या १५४ असून, त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
……….

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

…………………………

SURGICOMFORT Non Woven Elastic Ear-Loop Disposable Face Mask, 100 Pieces Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply