रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे कालपासून ४३ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (२५ जून) सायंकाळपासून आज सकाळपर्यंत करोनाचे आठ नवे रुग्ण सापडले असून, आज (२६ जून) सायंकाळी ३५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५५४ झाली असून, त्यापैकी ४०० रुग्ण बरे झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १८८ असून, त्यापैकी १४८ रुग्ण बरे झाले आहेत.

रत्नागिरीतील परिस्थिती
कोव्हीड केअर सेंटर घरडा, लवेल येथून आठ तर समाजकल्याण, रत्नागिरी येथून १५ अशा २३ रुग्णांना बरे झाल्याने आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४०० झाली आहे.

काल (२५ जून) सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आठ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे – जेलरोड, रत्नागिरी – २, कोतवडे, रत्नागिरी – २, हर्णै, ता. दापोली – १, गुहागर नाका, ता. चिपळूण – २, कणगवली, ता. लांजा – १

आज (२६ जून) सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्राप्त अहवालानुसार, कळंबणी ४, राजापूर १, रत्नागिरी १५, कामथे १०, लांजा १ आणि दापोली ४ असे एकूण ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ५५४ इतकी झाली आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनामुळे २४ जणांचा बळी गेला आहे, तर ४०० जण बरे झाले आहेत.

ॲक्टिव्ह कन्टेनमेन्ट झोन
आज रत्नागिरीतील कारवांचीवाडी हे क्षेत्र करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १९ गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये १, संगमेश्वर तालुक्यात १, दापोलीमध्ये ५ गावांमध्ये, खेडमध्ये आठ गावांमध्ये, लांजा तालुक्यात सहा, चिपळूण तालुक्यात सहा गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात २ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणाची रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – २८, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ३, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १९ असे एकूण ५२ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइन असणाऱ्यांची संख्या २२ हजार ३४२ इतकी आहे.

परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात २५ जूनपर्यंत एकूण एक लाख ५२ हजार ८९४ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ७९ हजार ८३३ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात काल (२५ जून) करोनाचे दोन नवे रुग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत करोनाच्या ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण १४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १८८ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
…….

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply