रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू; सिंधुदुर्गात नवे १४ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ जून) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत करोनाचे आणखी सहा बाधित रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दिवसभरात करोनाच्या नव्या १४ रुग्णांची नोंद झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५६० झाली आहे. कोव्हिड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी येथून ४, कोव्हिड केअर सेंटर, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथून ३, तर कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड येथून ३ अशा १० रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३० झाली आहे.

चिपळूण येथील ५४ वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा कोव्हिडने मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या २५ झाली आहे. या महिलेला गेल्या १९ जून रोजी मुंबईतून बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी तिचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेला मधुमेह आणि मूत्रपिंडाला मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. दाखल झाल्यापासून ती महिला बेशुद्धावस्थेतच होती. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ती व्हेंटिलेटरवर होती. तिचा आज मृत्यू झाला.

दरम्यान, काल सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार सहा नवीन बाधित रुग्ण आढळले. त्यांचे विवरण असे – साळवी स्टॉप (ता. रत्नागिरी), मु. पो. कोंडगे (ता. लांजा), मु. पो. देवरूख (ता. संगमेश्वर), गुहागर नाका (चिपळूण), मु. पो. पन्हळे, (ता. लांजा), कामथे (ता. चिपळूण).

सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १११ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ४८ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी १९, गुहागर १, संगमेश्वर १, दापोली ५, खेड ८, लांजा ६, चिपळूण ६, राजापूर २.

संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ५८ रुग्णांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ३४, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ३, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे- १, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल- ३, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १५.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आलेल्या होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींची संख्या २० हजार पाच आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण नऊ हजार १४२ नमुने तपासण्यात आले असून, त्यापैकी आठ हजार ८५४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५६० पॉझिटिव्ह, तर ८ हजार २६२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत आणखी २८८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
………
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयास आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये नऊ अहवाल पॉझिटिव्ह, तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २१३ झाली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत एकूण १५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
……..

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply