रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा आणखी एक बळी; सिंधुदुर्गातही एक मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे आज (३० जून) आणखी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या २६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याने, तेथील बळींची संख्या पाच झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात काल (२९ जून) सायंकाळपासून १९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९९ झाली आहे. त्यांचे विवरण असे – आडे ता. दापोली – १०, जालगाव, ता. दापोली – १, हर्णै, ता. दापोली – १, बुरोंडी, ता. दापोली – १, टेटवली मोहल्ला, ता. दापोली – १, मुगीज, ता. दापोली – १, फॅमिली माळ, दापेाली – १, गावडे आंबेरे, ता. रत्नागिरी – १, तिवंदेवाडी, शिरगाव, ता. रत्नागिरी – १, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी – १.

कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही दापोली येथून दोन रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३९ झाली आहे. हर्णै बाजारपेठ (ता. दापोली) येथील एका ६८ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३४ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज रत्नागिरीचे पोलीस वसाहत क्षेत्र करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आज (३० जून) सायंकाळची रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती अशी – एकूण करोनाबाधित रुग्ण – ५९९, बरे झालेले – ४३९, मृत्यू – २६, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – १३३ (+ १).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५४ झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. काल (२९ जून) जिल्ह्यातील आणखी एका व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २१४ अशी झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख १८ हजार ३६६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, दोन जुलैपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आठ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.
……

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply