रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत ६९ नवे करोनाबाधित; सिंधुदुर्गातही १३ रुग्णांची वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे नवे ६९ रुग्ण आढळले आहेत. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६८३ झाली आहे. काल (एक जुलै) रात्री उशिरा ४७, तर आज (दोन जुलै) सायंकाळी २२ नवे रुग्ण आढळले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील २२, दापोली तालुक्यातील १५, खेड तालुक्यातील १३, चिपळूण तालुक्यातील ११ आणि लांजा तालुक्यातील दोन जणांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज १३ नवे रुग्ण आढळून आले.

रत्नागिरीतील परिस्थिती
काल (एक जुलै) रात्री सापडलेल्या ४७ रुग्णांचा तपशील असा – जेल रोड क्वार्टर्स, रत्नागिरी – १०, डी. एस. पी. कार्यालय – १, कारवांची वाडी, ता. रत्नागिरी – १, परकार हॉस्पिटल, ता. रत्नागिरी – १, आडिवरे, ता. राजापूर – १, रत्नागिरी – ३, हर्णै, ता. दापोली- १२, खोपी, ता. खेड – १, वेरळ, ता. खेड – १, लोटे, ता. खेड – २, आष्टी, ता. खेड – २, घरडा कॉलनी, ता. खेड – २, खेड – २, खेर्डी, ता. चिपळूण – २, कापरेवाडी, ता. चिपळूण – १, चिपळूण – २, ब्राह्मणवाडी, ता. संगमेश्वर – २, मंडणगड – १.

आज (दोन जुलै) सायंकाळी सापडलेल्या २२ रुग्णांपैकी ११ रुग्ण कामथे येथील असून, सहा रुग्ण रत्नागिरीतील, तीन रुग्ण कळंबणीतील आणि दोन रुग्ण लांजा येथील आहेत.

सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०८ आहे.

परचुरी, पांगरी, कळंबुशी, देवरूख दत्तनगर, भडकंबा पेठवाडी, देवळे, तुरळ डिकेवाडी, भिरकोंड, संगमेश्वर, वाडावेसराड, कोळंबे, वांझोळे, वाशी तर्फ देवरुख, संगमेश्वर, निवे बु., दखीन, देवडे, कोंडगाव, दाभोळे या संगमेश्वर तालुक्यातील गावांमधील कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला भाग आता पूर्ववत करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील करोनाविषयक आज सायंकाळची स्थिती अशी – एकूण पॉझिटिव्ह – ६८३, बरे झालेले – ४४९, मृत्यू – २६, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – २०८. जिल्ह्यात सध्या ५३ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. त्यातील सर्वाधिक २० रत्नागिरी तालुक्यात, तर गुहागरात १, दापोलीत ६, खेडमध्ये ५, लांज्यात ६, चिपळुणात १२ आणि राजापूर तालुक्यात तीन गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत. सध्या जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरणात ८० जण आहेत. मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यातून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या १६ हजार २१६ आहे.

परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल (एक जुलै) सायंकाळपर्यंत एकूण एक लाख ६४ हजार १८९ चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्ह्यातून बाहेरगावी गेलेल्यांची संख्या ८८ हजार ६७४ आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २२९ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील आठ, कुडाळ तालुक्यातील तीन आणि देवगड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५४ असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे.
……

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply