बालरंगभूमी परिषदेतर्फे जुलै महिन्यात ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळा

रत्नागिरी : उद्याचे निपुण अभिनेते घडविण्याची ताकद बालरंगभूमीमध्ये असते आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. सध्या लॉकडाउनमुळे बाहेर फिरण्यावर निर्बंध आलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडू नये, म्हणून जुलै महिन्यात ऑनलाइन बाल नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

प्रकाश पारखी

गेली ५० वर्षे व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यप्रशिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविणारे ज्येष्ठ कलावंत प्रकाश पारखी यांचे मार्गदर्शन या ऑनलाइन कार्यशाळेत लाभणार आहे. ही कार्यशाळा सात ते १५ या वयोगटातील मुला-मुलींसाठी असून, जुलै महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी दोन तास ही कार्यशाळा होणार आहे. १०, १७, २४ आणि ३१ जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील ज्या मुला-मुलींना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा आसावरी शेट्ये यांनी केले आहे.

संपर्क :
आसावरी शेट्ये – 7507416166
अस्मिता सरदेसाई – 9284300966

(बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ऑनलाइन एकपात्री सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
……

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply