रत्नागिरी : जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज (२० जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या २७९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
नव्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी – ५, घरडा, खेड २२, उपजिल्हा रुग्णालय, कामथे १४, दापोली ५, लांजा ६. घरडा केमिकल्समधील आतापर्यंत एकूण पॉझिटिव्हची संख्या १३२ झाली आहे.
आज (२० जुलै) २३ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७४९ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर , पेढांबे येथील ७, कोव्हिड केअर सेंटर देवधे, लांजा येथील ५, पाचल (रायपाटण) येथील ४ आणि समाजकल्याण, रत्नागिरीमधील सात जण आहेत.
सायंकाळच्या स्थितीनुसार एकूण करोना पॉझिटिव्ह – १२६२, बरे झालेले – ७४९, मृत्यू – ४१, एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – ४७२.
आज फणसोप सडा परिसर, रत्नागिरी, मिरकरवाडा, रत्नागिरी, पोलीस वसाहत, रत्नागिरी, वाटद, खंडाळा, रत्नागिरी, आशीर्वाद अपार्टमेंट, माळ नाका, रत्नागिरी, नाचणे नरहर वसाहत, रत्नागिरी, नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राउंडशेजारी, रत्नागिरी, मयूरेश्वर कॉम्प्लेक्स,आयटीआय हॉस्टेलसमोर, नाचणे, रत्नागिरी, जुवे, रत्नागिरी, जयगड, रत्नागिरी, कुणबीवाडी कसोप, रत्नागिरी, भगवतीनगर भुतेवाडी, रत्नागिरी, शेट्येवाडी शिरगाव, रत्नागिरी, सनराइज रेसिडेन्सी, आझादनगर, मजगाव रोड, रत्नागिरी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
रत्नागिरी आणि परिसरातील जेल रोड, राजिवडा, मारुती मंदिर, चर्मालय, साळवी स्टॉप, उद्यमनगर, शिवाजीनगर, मजगाव रोड, नाचणे समर्थनगर, गणेशगुळे, शिरगाव तिवंडेवाडी, मिरजोळे, भाट्ये, कारवांची वाडी, निवळी, कोतवडे धामेलेवाडी, वेळवंड या भागातील करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २७९वर पोहोचली असून, त्यापैकी २४१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरू असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
…..
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
