रत्नागिरी : जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या कालपासून आज (तीन ऑगस्ट) रात्रीपर्यंत १०४ने वाढली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १९८५ झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत आणखी तिघा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ६४ झाली आहे. आतापर्यंत १३०४ रुग्णांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले असून, बरे होण्याचे प्रमाण ६७ टक्क्यांवर गेले आहे. सिंधुदुर्गात १३ नवे रुग्ण सापडल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या ४०५ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (तीन ऑगस्ट) बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड रुग्णालयातील ४, तर समाजकल्याण भवनातील एकाचा समावेश आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – रत्नागिरी ११, कामथे २२, कळंबणी १३, लांजा १. तसेच, ॲन्टिजेन चाचणीतून चौघांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुरोंडी (ता. दापोली) येथील ७० वर्षीय करोनाबाधित महिलेचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सती (चिपळूण) येथील ५८ वर्षीय रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात आणत असताना मृत्यू झाला. अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका रुग्णाचा आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६४ झाली आहे. आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी – रत्नागिरी १६, खेड ६, गुहागर २, दापोली १३, चिपळूण १३, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ४, मंडणगड १.
सध्या जिल्ह्यात ५६५ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. (तीन ऑगस्टला रात्री पावणेआठ वाजता मिळालेल्या अहवालानुसार ५५ रुग्णांची वाढ झाली असून, त्याचा समावेश यात नाही.)
नवी करोनाबाधित क्षेत्रे
आज रत्नागिरीतील टिळक आळी, टी. जी. शेट्येनगर, गोडबोले स्टॉप, लाला कॉम्प्लेक्स, सिव्हिल हॉस्पिटलमागे, माळ नाका, एसटी डेपोमागे, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, डीएसपी बंगल्याजवळ, रघुवीर अपार्टमेंट, आठवडा बाजार, विहार डिलक्स, माळ नाका, अशोकनगर परटवणे, नवानगर-भाट्ये, चिंचखरी, महालक्ष्मी मंदिराजवळ, खेडशी, साईनगर, कुवारबाव, कारवांचीवाडी फाटा, मौजे कर्ला, खालची गल्ली, जागुष्टे कॉलनी, कुवारबाव ही करोनाबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
समर्थनगर, नाचणे, आणि गोडाउन स्टॉप, नाचणे या परिसरातील करोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राच्या सीमा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या २५४ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ४८, दापोली १२, खेड ७१, लांजा ५, चिपळूण १०४, मंडणगड २, गुहागर ८, राजापूर ३, संगमेश्वर १.
सध्या संस्थात्मक विलगीकरणात १२९ रुग्ण असून त्यांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय ६१, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ६, उपजिल्हा रुग्णालय, कामथे २७, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी ११, कोव्हिड केअर सेंटर, घरडा १, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे २, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २१.
मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने २४ हजार ४३९ जण होम क्वारंटाइन आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (दोन ऑगस्ट) आणखी १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४०५ झाली आहे. त्यापैकी २९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १०२ जणांवार उपचार सुरू आहेत.
