राजापूर : मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघाच्या राजापूर तालुका शाखेतर्फे देवाचे गोठणे विभागातर्फे येत्या रविवारी (१६ ऑगस्ट २०२०) झूम अॅपद्वारे कृषी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
फलोत्पादनातून कोकण विकास या विषयावर आधारीत हे शिबिर सायंकाळी ४ वाजता सुरू होईल. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. जी. डी. जोशी आणि यशस्वी कृषी उद्योजक सखाराम माळी मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, संघ सरचिटणीस अरविंद डाफळे, संघ सहसचिव भास्कर चव्हाण, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, सचिव अनिल भोवड, ग्रामीण शाखेचे अध्यक्ष दीपक बेंद्रे, सचिव मानसी दिवटे, जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, प्रभाकर वारीक, सुधाकर गावडे, केशव आरेकर, अरुण तांबे, शंकर जोशी, सूर्यकांत बाणे, दर्शन खांबल, अॅड. अवधूत तोरस्कर, मधुकर मांडवकर, अविनाश नवाळे, श्रीकांत सोड्ये आदी सहभागी होणार आहेत.
झूम अॅपवरील या शिबिरात देवाचे गोठणे, सोलगाव, गोवळ, शिवणे, धाऊलवल्ली, आडिवरे, मोगरे, कशेळी, राजवाडी, कोंडसर बुद्रुक, साखरीनाटे, आंबोळगड आदी भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
झूम लिंक : https://us02web.zoom.us/j/81814048737?pwd=RzJubzRsNFdWSWl2L0FiUjR5aVgwUT09
Meeting ID : 818 1404 8737
Passcode : krushi