श्रावण अमावास्या, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक ३०वा – अनुलोम
साग्रयतामरसागारामक्षामाघनभारगौः । निजदेपरजित्यास श्रीरामे सुगराजभा ।।३०।।
अर्थ : वैभवसंपन्न अयोध्या, तामरस (कमळ), कमलासनस्थित राजलक्ष्मीचे सर्वोत्तम निवासस्थान बनले. तन, मन, धन सर्वस्व अर्पण करणाऱ्या अजिंक्य रामाच्या प्रभावी आणि न्यायी शासनाचा (म्हणजे रामराज्याचा) उदय झाला.
।। जय श्रीराम ।।
राघवयादवीयम् – श्लोक ३०वा – विलोम
भाजरागसुमेराश्रीसत्याजिरपदेजनि । गौरभानघमाक्षामरागासारमताग्र्यसा ।।३०।।
अर्थ : श्रीसत्यच्या (सत्यभामा) अंगणात असलेला (स्थापन केलेला) पारिजात वृक्ष फुलांनी डवरला होता. सत्यभामेला ही निर्मल संपत्ती मिळाल्यामुळे, कृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणीबद्दलचा मत्सर भाव सोडून देऊन ती कृष्णाबरोबर सुखासमाधानाने राहू लागली.
।। जय श्रीकृष्ण ।।
।।इति श्रीवेङ्कटाध्वरि कृतं श्री राघवयादवीयं।।
रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे राघवयादवीयम् या संस्कृत श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कवी वेंकटाध्वरी यांनी या श्लोकसंग्रहाची रचना केली. या रचनेत ३० श्लोक आहेत. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. श्रावण महिन्यात दररोज एका अनुलोम-विलोम श्लोकाचा मराठी अनुवाद कोकण मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. हा अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी करून दिला आहे. आज या रचनेचा शेवटचा श्लोक प्रसिद्ध करण्यात आला आहे. राघवयादवीयम् या अद्भुत रचनेविषयी अधिक वाचण्यासाठी आणि संपूर्ण रचना एकत्रितरीत्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
….
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.