रत्नागिरी जिल्ह्यात आज ६० नवे करोनाबाधित; आज एकही मृत्यू नाही

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. २३) करोनामुळे मरण पावलेल्या एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज नवे ६० रुग्ण मात्र आढळून आले.

आजच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – आरटीपीसीआर – रत्नागिरी ११, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ११, कळंबणी १४, चिपळूण ७, दापोली १८. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल दोन्ही तपासण्यांमध्ये पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० आहे. आता एकूण करोनाबाधितांची संख्या ३४०५ झाली आहे.

दरम्यान, आज बरे झालेल्या १४ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यात जिल्हा रुग्णालयातील ८, कोव्हिड केअर सेंटर आणि समाजकल्याण भवनातील ६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या आता २११८ झाली आहे. आजपर्यंतच्या एकूण मृतांची संख्या १२१ आहे. सध्या विविध रुग्णालयांमध्ये १२८७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply