रत्नागिरी जिल्ह्यात ६६ नवे करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २७) नव्या ६६ करोनाबाधितांची नोंद झाली, तर तिघांचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गात आज १८ नवे रुग्ण आढळले.

रत्नागिरीतील परिस्थिती
आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण असे – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४३, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ५, कळंबणी ५, लांजा १, परकार हॉस्पिटल १०, घरडा हॉस्पिटल २.

आज बरे झाल्याने घरी सोडलेल्या ९३ जणांचा तपशील असा – जिल्हा रुग्णालय ११, कळंबणी १, संगमेश्वर २, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन ४८, घरडा २९, पेढांबे २. आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २३२४ आहे.

आज निवळी फाटा (रत्नागिरी) येथील ७८ वर्षीय, कुवारबाव (रत्नागिरी) येथील ४५ वर्षीय आणि वेरळ (खेड) येथील ५५ वर्षीय अशा तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मरण पावलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची संख्या आता १२७ झाली आहे. तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४२, खेड १४, गुहागर ४, दापोली २१, चिपळूण २७, संगमेश्वर ९, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६४१ झाली असून, सध्याच्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९० आहे. सध्या संस्थात्मक विलगीकरणात ९१, तर गृह विलगीकरणात आठ हजार ८४८ जण आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १८ नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या १०७७ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४७२ जणांवर उपचार सुरू आहेत. ५८६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १६९ कंटेन्मेंट झोन असून, १२ हजार ६२१ नागरिक विलगीकरणात आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply