सिंधुदुर्गातील युवक करणार करोनाबाधित मृतांवर मोफत अंत्यसंस्कार

सावंतवाडी : करोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही लोकांकडून वारेमाप पैसे घेतले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील रुग्णवाहिकाचालक हेमंत वागळे या युवकाने मोफत अंत्यसंस्कार करण्याचा संकल्प केला आहे. जिल्ह्यात कोठेही करोनाने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला फोन करा, आपण रुग्णवाहिकेसह तात्काळ येऊन आणि आवश्यक सेवा देऊ, अशी तयारी त्याने दर्शविली आहे.

लोकांना व रुग्णाच्या नातेवाईकांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशाने आपण हा अनोखा उपक्रम राबवत असून, गरजू लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्याने केले आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून रुग्णांची व रुग्णांच्या नातेवाईकांची लूटमार होत आहे. दरम्यान, करोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीसुद्धा पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळताच हेमंत याने स्वतः पुढाकार घेतला आणि अशा मृतदेहांवर नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यासाठी तो पुढे सरसावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी कोठेही परिस्थिती उद्भवल्यास आपल्याशी 9420079106 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्याने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply