मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मा. दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय होणार

मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मास्टर दीनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २८ सप्टेंबर २०२० रोजी राज्य सरकारतर्फे ही घोषणा करण्यात आली. अशा प्रकारचे हे देशातील पहिले संगीत महाविद्यालय असेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होणार आहे. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी हे महाविद्यालय होणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी या वेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारकडून लतादीदींना वाढदिवसानिमित्त भेट म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातील कलाकार येत्या काळात तयार होतील, असे उदय सामंत म्हणाले. सामंत यांनी फोन करून लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज्य सरकारच्या या निर्णयावर लता मंगेशकर यांनीही आनंद व्यक्त केला.

(लतादीदींशी उदय सामंत यांनी साधलेल्या संवादाचा ऑडिओ सोबत देत आहोत.)

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply