रत्नागिरी जिल्ह्यात ४५, तर सिंधुदुर्गात १०४ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सहा ऑक्टोबर) करोनाचे नवे ४५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७७६९ झाली आहे. सिंधुदुर्गात १०४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ४१६४ झाली आहे.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज बरे झालेल्या १६० करोनाबाधितांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ६८०० झाली आहे. करोनामुक्तीचे हे प्रमाण ८७.५२ टक्के आहे.

आज जिल्ह्यात करोनाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी एक रुग्ण १८ सप्टेंबरला, दोघे ५ ऑक्टोबरला, तर दोघे आज मरण पावले. पाचपैकी एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता २८२ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर वाढून ३.६२ टक्के झाला आहे.

आजच्या नोंदींचा तपशील असा – संगमेश्वर वय ५२, पुरुष, संगमेश्वर वय ६५, महिला, संगमेश्वर वय ५६, पुरुष, खेड वय ५६, पुरुष, चिपळूण वय ७२, महिला. आतापर्यंतच्या तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ७६, खेड ४६, गुहागर १०, दापोली ३१, चिपळूण ६८, संगमेश्वर २७, लांजा १०, राजापूर १२, मंडणगड २ (एकूण २८२).

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (सहा ऑक्टोबर) आणखी १०४ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१६४ झाली आहे. आतापर्यंत ३१७३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०३ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply