रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ ऑक्टोबर) २२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात नव्या करोनाबाधितांची वाढ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ ऑक्टोबर) नवे २२ रुग्ण आढळले. त्यांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा : आरटीपीसीआर – मंडणगड १, खेड २, चिपळूण ३, रत्नागिरी १ (एकूण ७). रॅपिड अँटिजेन टेस्ट – दापोली १, चिपळूण ७, रत्नागिरी ७ (एकूण १५). जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८३४३ झाली आहे. बाधितांचा दर १५.०४ टक्के आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली. खेड येथील ७५ वर्षीय पुरुषाचा काल शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३११ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७२ टक्के आहे. मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८३, खेड ५०, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७४, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ४३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७७२१ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.५४ टक्के आहे. सध्या २२९ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ ऑक्टोबर) २७ जण, तर आतापर्यंत एकूण ४०९६ जण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५०२ आहे. जिल्ह्यात आज आणखी सात जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ४७२२ असून, आजपर्यंत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १२४ आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सात जण चिंताजनक असून, ते अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्यापैकी चौघे ऑक्सिजनवर, तर तिघे व्हेंटिलेटरवर आहेत.

