रत्नागिरीत ३, तर सिंधुदुर्गात १३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : आज (१७ नोव्हेंबर) करोनाचे रत्नागिरी जिल्ह्यात तीन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ रुग्ण आढळले. सिंधुदुर्गात आज दोघा महिलांच्या मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आढळलेले तिन्ही रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. त्यापैकी दोघे आरटीपीसीआर, तर एक जण रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. आजच्या तिघांसह जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ८५९७ झाली आहे. आज घरी सोडलेल्या २७ रुग्णांसह करोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ८१४५ झाली आहे. करोनामुक्तीचे हे प्रमाण ९४.७४ टक्के आहे.

सध्या जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या १७ जणांसह एकूण ६७ जण उपचार घेत आहेत. त्यातील सर्वाधिक २३ जण रत्नागिरीत कोविड रुग्णालयात रूपांतरित केलेल्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांचा ३१९ हा आकडा आणि ३.७१ ही टक्केवारी आजही कायम आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१७ नोव्हेंबर) नवे १३ करोनाबाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५०९० झाली आहे. आज जिल्ह्यातील चौघे जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या ४७९९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १५० सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आज दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील मधुमेहाचा त्रास असलेली ६४ वर्षीय महिला आणि कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील उच्च रक्तदाबाचा त्रास असलेलली ७० वर्षीय महिला या दोघींच्या मृत्यूची आज नोंद झाली. त्या दोघींसह जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १३५ झाली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply