रत्नागिरी : मच्छिमारांसाठी केंद्र सरकारने आणलेल्या योजना मच्छिमारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केले आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
याबाबत बोलताना माने म्हणाले, की प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने मच्छिमारांसाठी विकासाच्या अनेक योजना आणल्या आहेत; मात्र दुर्दैवाने राज्य सरकारने यामध्ये जेवढी सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे होती, तेवढी घेतलेली नाही. त्यामुळे मत्स्य अधिकाऱ्यांनी याबाबतची भूमिका घेऊन मच्छिमारापर्यंत जाऊन जनजागृती केली पाहिजे, बँकांनीसुद्धा त्याकरिता सहकार्य केले पाहिजे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तसेच मोठे जलाशय आहेत. त्यामध्ये मत्स्यसंपदेची निर्मिती होऊन, मच्छिमार चांगल्या प्रकारे आत्मनिर्भर होऊ शकतो. त्यासाठी या योजना मच्छिमारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी जयहिंद मच्छिमार या संस्थेच्या माध्यमातून आपण स्वतः प्रयत्न करत आहोत. आगामी सहा महिन्यांत कोकणातला हा मच्छिमार पंतप्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने कामकाज करेल, असा विश्वास आपल्याला असल्याचेही बाळ माने म्हणाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड