करोनाचे रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात १३ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ डिसेंबर) करोनाचे नवे सात रुग्ण आढळले, तर १३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आणि २६ जण बरे वाटल्याने घरी गेले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी तालुक्यात दोघे, तर चिपळूण तालुक्यात दोघे रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, दापोली आणि लांज्यात प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला. एकूण सात नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात सध्या १५१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये ६५ जण आहेत, तर सर्वाधिक ४९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ९१५५ झाली आहे.

आज चाचणी घेतलेल्या आणखी ११९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. जिल्ह्यात आज १३ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८६४६ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.४४ टक्के आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नसल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२७ एवढीच आहे. मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या ५८२४ झाली आहे. सध्या ३०० रुग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३६५ झाली आहे. सावंतवाडी शहरातील ५२ वर्षांचा पुरुष आणि मालवण शहरातील ६६ वर्षांचा पुरुष अशा दोघांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या १५५ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply