स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना केलेले आवाहन

१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यांनी भारतीयांना केलेले आवाहन त्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.
…..

स्वामी विवेकानंदांचे भारतीयांना आवाहन

स्वामी विवेकानंद म्हणतात, की जगातील कोणत्याही देशाहून भारतातील संस्थांची ध्येये आणि उद्दिष्टे ही अधिक उच्च आहेत. जगातील प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातिसंस्था पाहिली आहे. परंतु भारतात जातिसंस्थेची एक उत्कृष्ट व्यवस्था आहे. तिच्या मुळाशी जो एक उद्देश आहे, तसा इतरत्र कोठेही आढळत नाही. जाती विभाग जर टाळताच येत नसेल तर धनावर अधिष्ठित असलेल्या जाती विभागापेक्षा पावित्र्य, संस्कृती आणि त्याग यावर आधारलेला जाती विभाग मी पसंत करीन. म्हणूनच भारतीयांनो, निषेधाचे आणि निंदेचे शब्द उच्चारू नका. आपल्या हृदयाची कपाटे उघडा. आपली मातृभूमी आणि समस्त जग यांचा उद्धार करा. तुमच्यापैकी प्रत्येकाला याची जाणीव असू द्या की या कार्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावरच आहे. वेदांताची प्रकाशदायी तत्त्वे घरोघर पोहोचवा आणि प्रत्येकात ईश्वरतत्त्व जागृत करा. त्यातून यश कमी असो वा जास्त, तुम्हाला हे समाधान लाभेल की तुम्ही आपले जीवन एका महान कार्यासाठी व्यतीत केले आहे!

(संग्राहक – विलास यशवंत राजवाडकर, खेड)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply