झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय चौथा – भाग ८

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय चौथा – कर्मब्रह्मार्पण

संशयाच्या धुरें । ज्याचें मन कोंदे ।।
तेथें नाश नांदे । मूर्तिमंत ।।२७।।

श्रद्धा नाही जया । भक्ति नाहीं तया ।।
भक्ति नाहीं तया । शांति कैंची? ।।२८।।

संशय थैमान । मनीं घाली ज्याचे ।।
इह न तयाचें । कैचें पर? ।।२९।।

संशयवाद्याचें । मन मर्कटाचें ।।
पिशापरी नाचे । घरीं दारीं ।।३०।।

म्हणूनी संशय । मारूनीया वेगें ।।
लागे वेगें, लागे । युद्धाला रे ।।३१।।

Chapter 4 – Actions submitted to His Feet

Covered whose intellect । With dust of doubt ।
No doubt perishment । Destined for him ।।27।।

Absence of belief । Loses dedication ।
Peace impossible । If no devotion ।।28।।

That whose mind । Suspicion occupied ।
Can’t enjoy life-ride । Afterlife apart ।।29।।

Mind with suspense । Full of fickleness ।
Pops with madness । Here and there ।।30।।

Therefore, listen । Curb all suspicion ।
Take on the mission । Of batteling ।।31।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ चतुर्थोऽध्यायः । ज्ञानकर्मसंन्यासयोगः

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४-४०॥

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥४-४१॥

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४-४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply