रत्नागिरीत भाजपतर्फे शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी

रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे रत्नागिरीत शिवगान स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची स्पर्धा जिल्हा नगर वाचनालयात स्पर्धा होईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या २५ स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.

जिल्हा स्तरावरील या स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ९ फेब्रुवारी रोजी नगर वाचनालयात होणार आहे. ही स्पर्धा सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत असेल. स्पर्धेसाठी गीतांची निवड करताना छत्रपती शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा समावेश असला पाहिजे. ही स्पर्धा खुली असून यात दक्षिण रत्नागिरी जिल्हा विभागातील कोणत्याही नागरिकास सहभागी होता येईल. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्यस्तरावर होणार आहे. स्पर्धेत मराठी, हिंदी व संस्कृत भाषेतील गीत सादर करता येईल. स्पर्धकांनी प्रवेशिकेच्या वेळी गीताची प्रत देणे आवश्यक असेल.

स्पर्धेसाठी वयोगट मर्यादा किमान बारा वर्षे पूर्ण अशी ठेवण्यात आलेली आहे. गीत गायनासाठी स्पर्धकाने साथीसाठी लागणारे वाद्य वादक स्वतः आणले तरी चालणार आहे. स्पर्धा संयोजकांकडूनही साथीदार पुरविले जातील. स्पर्धेसाठी किमान तीन ते पाच मिनिटांची वेळ ठेवण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धा कालावधीत करोना संबंधित शासकीय नियमांचे पालन अनिवार्य राहणार आहे.

जिल्हा स्तरावरील प्राथमिक फेरीसाठी पारितोषिके अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार अशी पहिली तीन पारितोषिके आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. विजेत्याला स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रथम दोन क्रमांकांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जाईल.

शिवगान गीत गायन स्पर्धेसाठी आपली नावे https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdraoyG3EyNzaO2_sRvYx0kadVC6uOfu2RTa7-aYbtZAt9bVQ/viewform?usp=sf_link या गुगल फॉर्मवर नोंदवावीत. अधिकाधिक शिवप्रेमी गायकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा समन्वयक आणि भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक आघाडी संचालिका प्रख्यात गायिका मुग्धा भट-सामंत यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply