रत्नागिरीत १२, सिंधुदुर्गात २१ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ मार्च) करोनाचे नवे १० रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार १८१ झाली आहे. आज १२ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १५ बाधित रुग्ण आढळले, तर २१ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १० रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि खेडमध्ये प्रत्येकी २, तर संगमेश्वर आणि मंडणगड तालुक्यात प्रत्येकी १ (एकूण ६) बाधित रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत ३, तर दापोली तालुक्यात १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार १८१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८६ हजार ८८० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६० आहे. त्यातील सर्वाधिक ५२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ६७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १२ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९६३५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६३ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ३७० असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत २१ आणि आजपर्यंत एकूण ६ हजार २११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्ती बाधित झाल्याचा तपासणी अहवाल आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. आज १५ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६ हजार ५५५ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७६ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply