झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दहावा – भाग ८

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दहावा : विभूतियोग

अनंत विभूति । सांगूं तरी किती ।।
ऐकशील किती । पार्थराया! ।।२९।।

आकाशीं चांदण्या । समुद्राच्या लाटा ।।
कोणा तरी बेटा । मोजूं येती? ।।३०।।

जें जें अलौकिक । अद्भुत उज्ज्वल ।।
झालें तें सकल । माझ्या अंशें ।।३१।।

सांगितल्या गोष्टी । किती तुज आतां ।।
जाणूनी समस्ता । फल काय?।।३२।।

एकांशेंच विश्‍व । व्यापी मी हें नीट ।।
गोष्टींतली गोष्ट । ध्यानीं धरीं ।।३३।।

Chapter 10 – The Divine Grace

Forms innumerable । Counting impossible ।
Are you too able । To comprehend? ।।29।।

Stars in the skies । Waves of the seas ।
Calculating these । Not possible ।।30।।

What’s extra-ordinary । Strange and legendary ।
Produced from the glory । Only of mine ।।31।।

I told a lot । What is what ।
Knowing all that । What’s outcome? ।।32।।

Wholly I alone । Occupy the sphere ।
Secret of the secret । Do know better ।।33।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ दशमोऽध्यायः । विभूतियोगः

श्रीभगवानुवाच ।

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥१०-४०॥

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसम्भवम् ॥१०-४१॥

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥१०-४२॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥१०॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply