झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय अकरावा – भाग १

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय अकरावा : विश्‍वरूपदर्शन

गूढ गूढ ज्ञान । कथूनी दातारा ।।
केलें या लेंकरा । धन्य धन्य! ।।१।।

गेला मोह लया । भीति न उरली ।।
बुद्धि परतली । झालों जागा ।।२।।

जन्म आणि लय । जीवांचा विस्तारें ।।
आनंदें आदरें । परिसीला ।।३।।

अपार महिमा । देवा, आहे तूझा ।।
हेंही केशिराजा । कळों आलें ।।४।।

Chapter 11 – Glimpses of the Universal form

Oh, God great । The extreme secret ।
Knowledge you kept । In front of me ।।1।।

Illusion fled । Fear ended ।
Mind reverted । Fully awoke ।।2।।

Listened reverently । Creatures accordingly ।
Generate consequently । Through birth and death ।।3।।

Par excellence । Is your elegance ।
I came to know । The significance ।।4।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथैकादशोऽध्यायः । विश्वरूपदर्शनयोगः

अर्जुन उवाच ।

मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥११-१॥

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥११-२॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply