झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय अकरावा – भाग १०

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय अकरावा : विश्‍वरूपदर्शन

सारे माझे दोष । पोटांत घालाया ।।
समर्थ बा सदया । तूंचि एक ।।३६।।

पूर्वीं जें ना कधीं । रूप पाहियेलें ।।
पाहोनी तें भ्यालें । मन माझें ।।३७।।

सौम्य तें पहिलें । रूप तुझें आतां ।।
दावी रमानाथा । मजलागीं ।।३८।।

साजिरें गोजिरें । रूप तें सावळें ।।
पाहूं उतावळें । मन झालें ।।३९।।

Chapter 11 – Glimpses of the Universal form

Same way, The First Cause । For carrying the cause ।
To overlook my flaws । You are able ।।36।।

Never before this । Had seen this ।
Looking all this । Fully scared ।।37।।

Show me now । Yoyr usual form ।
Which is normal । And full of charm ।।38।।

Graceful and lovely । Complexioned lightly ।
My mind is earnestly । Eager to watch ।।39।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथैकादशोऽध्यायः । विश्वरूपदर्शनयोगः

अर्जुन उवाच ।

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ११-४५॥

किरीटिनं गदिनं चक्रहस्तं
इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ११-४६॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply