सिंधुदुर्गात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढले, सात जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज वाढ झाली आहे. आज बाधा झालेले नवे २८४ रुग्ण आज आढळले, तर ६२ जण करोनामुक्त झाले. आज सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या २८४ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १० हजार ३४३ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ३४, दोडामार्ग – १९, कणकवली – ७८, कुडाळ – ३९, मालवण – २७, सावंतवाडी – ३३, वैभववाडी – ३९, वेंगुर्ले १५.

आज ६२ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ३९५ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ७१४ आहे. सर्वाधिक ५१४ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३७०, दोडामार्ग १६२, कुडाळ ४७१, मालवण ३१३, सावंतवाडी ३२२, वैभववाडी ३६३, वेंगुर्ले १७६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २३.


सक्रिय रुग्णांपैकी ९८ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यापैकी ७७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २१ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. आंबडपाल, मुळदे, ता. कुडाळ येथील ६३ वर्षीय महिला. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २) मु. पो. कनकनगर, ता. कणकवली येथील ८५ वर्षीय पुरुष. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ३) मु. पो. न्हावेली, ता. सावंतवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ४) मु. पो. नांदगाव, ता. कणकवली येथील ८० वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५) मु. पो. मेढा, ता. मालवण येथील ७४ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ६) मु. पो. भिकेकोनाळ, ता. दोडामार्ग येथील ६० वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ७) मु. पो. कुणकवणे, ता. देवगड येथील ६१ वर्षीय पुरुष. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply