सिंधुदुर्गात करोनाचे नवे १८३ रुग्ण, ११४ जण करोनामुक्त, सहा जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२१ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे १८३ रुग्ण आढळले, तर ११४ जण करोनामुक्त झाले. आज सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या १८३ नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता १० हजार ५२६ झाली आहे.
आजच्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २९, दोडामार्ग – २, कणकवली – २७, कुडाळ – २९, मालवण – २२, सावंतवाडी – १६, वैभववाडी – ३८, वेंगुर्ले १६. जिल्ह्याबाहेरील ४.

आज ११४ जण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७ हजार ५०९ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची आजची संख्या दोन हजार ७७७ आहे. सर्वाधिक ५०३ सक्रिय रुग्ण कणकवली तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ३९४, दोडामार्ग १६२, कुडाळ ४६८, मालवण ३१२, सावंतवाडी ३३०, वैभववाडी ३९५, वेंगुर्ले १८६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी १६७ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी १३५ रुग्ण ऑक्सिजनवर तर ३२ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यांचा तपशील असा – १) मु. पो. कनकनगर, ता. कणकवली येथील ८२ वर्षीय पुरुष. त्याला मधुमेहाचा आजार होता. २) मु. पो. कलमठ, ता. कणकवली येथील ६२ वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ३) मु. पो. नानिवडे, ता. वैभववाडी येथील ६५ वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ४) मु. पो. मालवण येथील ७५ वर्षीय महिला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ५) मु. पो. भटवाडी कॅम्प, वेंगुर्ले येथील ६५ वर्षीय महिला. तिला मधुमेहाचा आजार होता. ६) मु. पो. पिराचा दर्गा ता. वेंगुर्ले येथील ५० वर्षीय पुरुष. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होता.

जिल्ह्यात केवळ ७ बेड शिल्लक
जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांसाठी जिल्हा कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल मिळून एकूण २९३ बेड आहेत. त्यापैकी २८८ बेड भरले असून केवळ ७ बेड शिल्लक आहेत. मालवण येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये २, तर पडवे येथील एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये ५ असे एकूण ७ बेड शिल्लक असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. शासकीय रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply