रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या पाचशेहून कमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधितांची संख्या पाचशेच्या खाली आली आहे. आज ४७७ नवे बाधित आढळले, १२३ जण बरे होऊन घरी गेले, तर आज १३ जणांचा मृत्यू झाला.

आजही सर्व तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक १०७ रुग्ण संगमेश्वर तालुक्यात होते.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ६०, दापोली ४, गुहागर २७, चिपळूण १३, संगमेश्वर ३१, लांजा ४१, राजापूर १३. (एकूण १८९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १५, दापोली ५, खेड ३९, गुहागर ६८, चिपळूण ४२, संगमेश्वर ७६, मंडणगड ६, लांजा २७, राजापूर ११०. (एकूण २८८) (दोन्ही मिळून ४७७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १७ हजार ५१ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजार २४२ आहे. त्यातील सर्वाधिक १४५ रुग्ण रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात, तर त्याखालोखाल १२६ रुग्ण महिला रुग्णालयात दाखल आहेत. एक हजार ४८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १२३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १२ हजार ४८९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ७३.२४ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ८५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख १७ हजार १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज १३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यात १९ ते २१ एप्रिल या कालावधीत मरण पावलेल्यांचा समावेश आहे. त्यापैकी १० जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर तिघांचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तालुकानिहाय तपशील असा – संगमेश्वर – ४ (३ पुरुष, १ महिला), लांजा – २ (एक पुरुष, एक महिला), गुहागर – २ (एक पुरुष, एक महिला), रत्नागिरी – १ (पुरुष), खेड – १(महिला), दापोली – १ (महिला), चिपळूण – २ (दोन्ही पुरुष). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४८८ झाली असून मृत्युदर २.८६ टक्के आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply