करोना प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात दुकाने सकाळी चार तास उघडी राहणार

रत्नागिरी : करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक पुरवणी आदेश आज, २१ एप्रिल रोजी जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ७ ते ११ या चार तासांसाठीच उघडी राहणार आहेत.

राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा सध्या लागू आहे. याबाबत राज्य शासनाच्या १३ एप्रिल २०२१ च्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात १४ एप्रिलपासून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर राज्य शासनाच्या २० एप्रिलच्या आदेशान्वये सुधारित आदेश जारी झाले आहेत. यापूर्वीच्या १४ एप्रिलच्या आदेशाला अनसरून पुरवणी आदेश आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जारी केला.

सुधारित आदेशानुसार जिल्ह्यातील वैद्यकीय, आरोग्य सुविधा आणि औषधआंची दुकाने पूर्णवेळ खुली राहतील.
अत्यावश्यक सेवेतील किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, मटण, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडीपदार्थ विक्री दुकाने, कृषी अवजारे, शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी ७ सकाळी ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. नगरपालिका, नगरंपचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या पाच हजारापेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा माल दुकाने, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, इतर दुकाने दिवसभर बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच अन्नधान्याचे व सामानाचे वितरण करता येईल. तथापि या दुकानांमध्ये मालाची विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेपर्यंतच करता येईल. त्यानंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्यासाठी त्याची RTPCR / RAT / – Ve Test Report दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असेल. पाच हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागातील दुकानांनाही हाच नियम लागू राहील. शासकीय स्वस्त धान्य दुकाने आणि केरोसीन दुकानेही सकाळी ७ ते ११ या वेळेतच चालू राहतील.

या सर्वांसाठी होम डिलिव्हरी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत करता येईल. घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे, RTPCR, RAT चाचणी करणे बंधनकारक राहील. त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना स्वत:कडे बाळगणे आवश्यक राहील.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply