रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ६१५ रुग्ण, २४ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ एप्रिल) नवे ६१५ रुग्ण आढळले. आज ३७ जण करोनामुक्त झाले, तर २४ जणांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्ह्यात आज मंडणगड तालुक्यात एकही करोनाबाधित आढळला नाही, सर्वाधिक २३१ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात सापडले.

जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९३, दापोली ६, गुहागर ८५, संगमेश्वर १७, लांजा १०, राजापूर २८. (एकूण २३९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १३८, दापोली १८, खेड २८, गुहागर ५५, चिपळूण ५२, संगमेश्वर ५९, लांजा १४, राजापूर १२. (एकूण ३७६). (दोन्ही मिळून ६१५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १९ हजार २२४ झाली आहे.

जिल्ह्यात आज ३७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनामुक्तांची एकूण संख्या १३ हजार ७६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर कमी झाला असून तो ६८.०१ टक्के झाला आहे.

आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी एक हजार २५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण एक लाख २१ हजार १९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ४ आणि आजचे २० अशा एकूण २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ५७६ झाली असून मृत्युदर २.९९ टक्के आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण मृत्यू असे – रत्नागिरी १४१, खेड ७८, गुहागर २३, दापोली ६१, चिपळूण १२२, संगमेश्वर ८६, लांजा २५, राजापूर ३४, मंडणगड ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply