सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारपासून आठ दिवस कडक लॉकडाउन, रत्नागिरीतही शक्यता

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या (९ मे) रात्री बारा वाजल्यापासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अऩिल परब यांच्याशी चर्चा करून रत्नागिरी जिल्ह्यातही हा निर्णय लागू होण्याची शक्यता श्री. सामंत यांनी बोलून दाखवली.

श्री. सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने उद्या रात्री बारा वाजल्यापासून पंधरा तारखेपर्यंत अतिशय कडक लॉकडाउन केले जाणार आहे. या लॉकडाउनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, आंबा वाहतूक, लसीकरण आणि अन्य महत्त्वाच्या बाबींसाठी सूट देण्यात येणार असून बाकी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लॉकडाउनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply