रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या स्थिती सुधारत चालल्याचे लक्षण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाची स्थिती सुधारत चालल्याचे लक्षण दिसू लागले आहे. आज (१० मे) सलग चौथ्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्याही घटली आहे.

आज नवे ३१० करोनाबाधित आढळले, तर सुमारे दुप्पट म्हणजे ६०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९८, चिपळूण ४३, संगमेश्वर ३०, लांजा ८ आणि राजापूर ११ (एकूण १९०), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २२, दापोली १४, खेड ११, गुहागर ६, चिपळूण ३३, लांजा ४ आणि राजापूर ३० (एकूण १२०) (दोन्ही मिळून ३१०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २७ हजार २७१ झाली आहे. आजही मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार ७८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी ७१९ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३८ हजार १८० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ६०१ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २१ हजार ३७८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारीही वाढली असून ती आज ७८.३९ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ६ आणि आजचे ५ अशा एकूण ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या सर्व ५ जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ८१५ झाली असून मृत्युदर २.९८ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २०९, खेड ९१, गुहागर ३४, दापोली ७६, चिपळूण १६८, संगमेश्वर ११८, लांजा ५०, राजापूर ६१, मंडणगड ८. (एकूण ८१५).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply