रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे ४२१ रुग्ण, ४१० करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ मे) करोनाचे नवे ४२१ रुग्ण आढळले, तर ४१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या तक्त्यात यापूर्वीचे म्हणजे जुने २०१ रुग्ण दाखविण्यात आले आहेत. त्यांच्यासह आज ६२२ रुग्ण दाखविले गेले आहेत. मात्र जुने म्हणजे कधीचे, याबाबत प्रशासनाकडून खुलासा होऊ शकला नाही. ते खासगी रुग्णालयांमधील जुने रुग्ण आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी कळविले आहे. मात्र जुन्या रुग्णांची नोंद खासगी रुग्णालयांकडून राहिली कशी, याचा खुलासा होऊ शकला नाही.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९३, दापोली २, गुहागर १, चिपळूण ५७ आणि लांजा ४३ (एकूण १९६), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६८, दापोली १०, खेड १४, गुहागर २६, चिपळूण ३२, संगमेश्वर ४६, लांजा १३ आणि राजापूर १६ (एकूण २२५) (दोन्ही मिळून ४२१).

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २७ हजार ८९३ झाली आहे. आजही मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून पाच हजार २६१ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार १२७ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार ३०७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४१० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २१ हजार ७८८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ७८.११ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे १२ आणि आजचे १७ अशा एकूण २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आज मरण पावलेल्या १७ पैकी चौघांचा मृत्यू खासगी रुग्णालयांत झाला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ८४ झाली असून मृत्युदर ३ टक्क्यांच्या वर गेला असून तो ३.०२ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २२५, खेड ९८, गुहागर ३५, दापोली ७७, चिपळूण १७१, संगमेश्वर ११८, लांजा ५०, राजापूर ६२, मंडणगड ८. (एकूण ८४४).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply