सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार २१४ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ मे) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७५, तर आतापर्यंत एकूण १४ हजार २१४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ४५५ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

पुन्हा तपासणी केलेल्या ४ रुग्णांसह आजच्या रुग्णांची एकूण संख्या ४५५ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २० हजार १५२ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ९०, दोडामार्ग – ३७, कणकवली – ५७, कुडाळ – ७०, मालवण – ८३, सावंतवाडी – ६२, वैभववाडी – ९, वेंगुर्ले – ४५, जिल्ह्याबाहेरील – २.

जिल्ह्यात सर्वाधिक ९९४ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ९११ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्ण असे – देवगड ८६६, दोडामार्ग ३८५, कणकवली ७४५, मालवण ७७५, वैभववाडी १४४, वेंगुर्ले ५९८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २७. सक्रिय रुग्णांपैकी ३५५ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३१२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४८७ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – कणकवली ३, कुडाळ १, मालवण २, सावंतवाडी २, वेंगुर्ले २.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply