सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ मे) नवे २२३ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५३२, तर आतापर्यंत एकूण १४ हजार ४३४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्दी-तापाच्या रुग्णांकरिता करोनाविषयक चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
पुन्हा तपासणी केलेल्या एका रुग्णासह आज सापडलेल्या रुग्णांची संख्या २२३ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २० हजार ६७९ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – २९, दोडामार्ग २४, कणकवली – ७१, कुडाळ – ५१, मालवण – २७, सावंतवाडी – ६, वैभववाडी – ४, वेंगुर्ले – ८, जिल्ह्याबाहेरील – २.
सध्या जिल्ह्यात ४ हजार ९१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक १०११ सक्रिय रुग्ण कुडाळ तालुक्यात, तर त्याखालोखाल ७६५ रुग्ण मालवण तालुक्यात आहेत. इतर तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६७६, दोडामार्ग ३४४, कणकवली ५९९, सावंतवाडी ७५४, वैभववाडी १२०, वेंगुर्ले ६१८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २६. सक्रिय रुग्णांपैकी ३६९ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३२३ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
आज जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५२२ झाली आहे. आजच्या मृतांचा तपशील असा – देवगड ३, कणकवली ५, कुडाळ २, सावंतवाडी १.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ६०, दोडामार्ग – १५, कणकवली – ११६, कुडाळ – ८०, मालवण – ७५, सावंतवाडी – ९५, वैभववाडी – ४०, वेंगुर्ले – ३९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.
सर्दी, ताप, खोकच्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. बऱ्याचवेळा रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याकरिता सुरवातीला खासगी डॉक्टर्सकडून औषधोपचार सुरू करतात. अशा रुग्णांवर औषधोपचार करताना खासगी डॉक्टर्स आरटीपीसीआर चाचणी करून घेत नाहीत. त्यामुळे या रुग्णांचा करोना विषाणू प्रादुर्भाव बळावतो. तशेवटी तो रुग्ण ऑक्सिजन पातळी ४० ते ६० पर्यंत खाली आल्यानंतर सीसीसी, डीसीएचसी किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल होतात. अशा रुग्णांवर योग्य औषधोपचार न झाल्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टर्सनी त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला, इली, सारी असल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक असेल. या रुग्णांची यादी आणि चाचणीचा अहवाल संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे दररोज पाठविण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
