रत्नागिरीत बाधितांच्या दुपटीहून अधिक करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२२ मे) करोनाचे नवे ३७२ रुग्ण आढळले, तर ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९२, दापोली २, गुहागर ७, चिपळूण २६, संगमेश्वर ८, लांजा ३ आणि राजापूर १० (एकूण २८३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ३, दापोली २ आणि चिपळूण ७. (एकूण १२). (दोन्ही मिळून १५९). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २१३. (सर्व मिळून ३७२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३२ हजार ४४४ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ८३७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ३५६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५४ हजार ९३७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ७७६ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २७ हजार ५६१ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८४.९४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक एक हजार ४६ झाली आहे. मृत्युदर ३.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २९७, खेड ११३, गुहागर ५०, दापोली ९६, चिपळूण २०८, संगमेश्वर १३८, लांजा ५७, राजापूर ७६, मंडणगड ११. (एकूण १०४६).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply