सिंधुदुर्गात नवे ४८३ रुग्ण, १७० करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२४ मे) नवे ४८३ करोनाबाधित रुग्ण आढळले. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १७०, तर आतापर्यंत एकूण १७ हजार २६५ जण करोनामुक्त झाले.

पुन्हा तपासणी केलेल्या १८ रुग्णांसह आज सापडलेल्या रुग्णांची संख्या ४८३ आहे. आजच्या नव्या रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता २२ हजार ८६१ झाली आहे. आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ५८, दोडामार्ग – ६६, कणकवली – ६८, कुडाळ – ८२, मालवण – ७३, सावंतवाडी – ५३, वैभववाडी – २२, वेंगुर्ले – ४२, जिल्ह्याबाहेरील १.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ९८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६२२, दोडामार्ग ३८८, कणकवली ६६५, कुडाळ ८४२, मालवण ८३९, सावंतवाडी ८०९, वैभववाडी १५४, वेंगुर्ले ५३९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २८. सक्रिय रुग्णांपैकी ३६१ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. त्यापैकी ३१२ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आज जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६०४ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड ६, कणकवली २, कुडाळ १, मालवण १, सावंतवाडी १, वैभववाडी १, वेंगुर्ले १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या तालुकानिहाय मृत्यूची एकूण संख्या अशी – देवगड ७४, दोडामार्ग – १७, कणकवली – १२९, कुडाळ – ९०, मालवण – ९३, सावंतवाडी – १००, वैभववाडी – ४६, वेंगुर्ले – ५३, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – २.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply