रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मे) करोनाचे नवे ३९३ रुग्ण आढळले, तर ३९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बाधित आणि करोनामुक्तांची संख्या आज जवळपास सारखीच आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ११२, दापोली ३, चिपळूण ३८, संगमेश्वर ३२, लांजा १९ आणि राजापूर ६५ (एकूण २६९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १२, दापोली १ आणि चिपळूण ४. (एकूण १७). (दोन्ही मिळून २८६). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १०७. (सर्व मिळून ३९३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३३ हजार २३९ झाली आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून तीन हजार ५६४ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी ९२० जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार ४१२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ३९८ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २८ हजार ५७७ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.९७ टक्के आहे.
जिल्ह्यात आज १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ९८ झाली आहे. मृत्युदर ३.३० टक्क्यांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३१३, खेड ११६, गुहागर ५९, दापोली ९८, चिपळूण २२१, संगमेश्वर १४५, लांजा ५८, राजापूर ७६, मंडणगड १२. (एकूण १०९८).

