ज्ञान प्रबोधिनीतर्फे वालावलकर रुग्णालयाला पावणेचार लाखाचे साहित्य

रत्नागिरी : ज्ञान प्रबोधिनीतर्फे उत्तम गुणवत्तेचा एक व्हेंटिलेटर आणि दोन ऑक्सिजन संयंत्रे डेरवण (ता. चिपळूण) येथील भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालयाला देण्यात आले. या उपकरणांसाठी तीन लाख ७० हजार रुपये खर्च करण्यात आला. त्यासाठी अमेरिकेतील ज्ञान प्रबोधिनी फौंडेशनने भरीव मदत केली.

या वस्तू प्रदान करण्याच्या प्रसंगी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुवर्णा पाटील, ज्ञान प्रबोधिनीच्या चिपळूण संपर्क केंद्रातर्फे माधव मुसळे, पराग लघाटे, डॉ. राजश्री सोमण आणि स्वानंद हिर्लेकर उपस्थित होते.

वालावलकर रुग्णालयाचे ग्रामीण क्षेत्रातील काम डॉ. सुवर्णा पाटील यांनी सविस्तरपणे मांडले. ज्ञान प्रबोधिनीसोबत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भविष्यात काय काम करता येईल याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अतिशय योग्य वेळी योग्य साहित्य रुग्णालयास मिळाले. त्यामुळे चिपळूण परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. ज्ञान प्रबोधिनीच्या या योगदानाबद्दल डॉ पाटील यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply