रत्नागिरीत करोनामुक्तांची संख्या ३३ हजार ७८५

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (५ जून) करोनाचे नवे ५८२ रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ३९ हजारावर, तर करोनामुक्तांची संख्या ३३ हजारावर गेली आहे. आज ३६५ जण करोनामुक्त झाले. नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अजूनही वाढलेले नाही.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३७४, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २०८ (दोन्ही मिळून ५८२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३९ हजार ६३३ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ५१८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज दोन हजार ८०८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ८२ हजार ७०४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३६५ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३३ हजार ७८५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.२४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक ४, राजापूर तालुक्यात ३, चिपळूण तालुक्यात दोन तर संगमेश्वर तालुक्यात एका रुग्णाचा मृत्यू आज नोंदविला गेला. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३३० झाली आहे. मृत्युदर ३.३५ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ३८८, खेड १३२, गुहागर ९५, दापोली ११६, चिपळूण २६२, संगमेश्वर १६१, लांजा ६८, राजापूर ९६, मंडणगड १२. (एकूण १३३०).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply