रत्नागिरीत नवे ५६७ बाधित, ६५४ रुग्ण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (८ जून) करोनाचे नवे ५६७ रुग्ण आढळले, तर ६५४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. त्यामुळे अनेक दिवसांनी सलग दुसऱ्या दिवशी नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार २७०, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २९७ (दोन्ही मिळून ५६७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४१ हजार १९६ झाली आहे. बाधितांचा जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.७६ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ३७९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार ११८ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार ६९३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ६५४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३५ हजार ४१८ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.९७ टक्के आहे.

जिल्ह्यात पूर्वीच्या १५ आणि आजच्या ६ अशा २१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ३९९ झाली आहे. मृत्युदर ३.३९ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४१३, खेड १३५, गुहागर १०२, दापोली १२२, चिपळूण २७६, संगमेश्वर १६७, लांजा ७३, राजापूर ९९, मंडणगड १२. (एकूण १३९९).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply