रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचा मृत्युदर वाढताच

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (९ जून) करोनाचे नवे ५२५ रुग्ण आढळले, तर ३२७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज २९ जणांचा मृत्यू नोंदविला गेल्याने सातत्याने वाढणाऱ्या मृत्युदरात आजही वाढ झाली.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार ३०४, रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार २२१ (दोन्ही मिळून ५२५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ४१ हजार ७२१ झाली आहे. बाधितांचा जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर १७.६८ टक्के आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ५४८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज तीन हजार ४८९ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९४ हजार १८२ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३२७ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ३५ हजार ७४५ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८५.६७ टक्के आहे.

जिल्ह्यात पूर्वीच्या २१ आणि आजच्या ८ अशा २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ४२८ झाली आहे. मृत्युदर वाढून ३.४२ टक्के झाला आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी ४२१, खेड १३६, गुहागर ११३, दापोली १२२, चिपळूण २७९, संगमेश्वर १६८, लांजा ७७, राजापूर १००, मंडणगड १२. (एकूण १४२८).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply