सिंधुदुर्गात नवे ४९२ करोनाबाधित, ५१९ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १४ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर ५१९ जण करोनामुक्त झाले.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ७ जणांच्या दुबार तपासणीसह ४९२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ७५, दोडामार्ग – ३२, कणकवली – ९९, कुडाळ – ४९, मालवण – १०७, सावंतवाडी – ८०, वैभववाडी – २०, वेंगुर्ले – २३.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १०१५, दोडामार्ग २४९, कणकवली १२३२, कुडाळ १२७४, मालवण १४१०, सावंतवाडी ७८८, वैभववाडी २९०, वेंगुर्ले ५७५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २९. सक्रिय रुग्णांपैकी ३४१ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८७५ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड २, कणकवली २, कुडाळ १, मालवण २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२१, दोडामार्ग – २६, कणकवली – १७७, कुडाळ – १३६, मालवण – १५७, सावंतवाडी – १२८, वैभववाडी – ५९, वेंगुर्ले – ६७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ५.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply