सिंधुदुर्गात १०२ वर्षांच्या आजीबाईंसह ७५४ रुग्ण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, १४ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५५३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १०२ वर्षांच्या आजीबाईंसह ७५४ जण करोनामुक्त झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ३ जणांच्या दुबार तपासणीसह ५५३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८८, दोडामार्ग – ८, कणकवली – १११, कुडाळ – ११०, मालवण – ८९, सावंतवाडी – ६१, वैभववाडी – ६१, वेंगुर्ले – ५५, जिल्ह्याबाहेरील २.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९२८, दोडामार्ग २२८, कणकवली १२१०, कुडाळ १२३३, मालवण १३५६, सावंतवाडी ७७६, वैभववाडी २९७, वेंगुर्ले ५८८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २९. सक्रिय रुग्णांपैकी ३३३ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज ७५४ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या २७ हजार ७१७, तर एकूण करोनाबाधितांची संख्या ३५ हजार २५६ झाली आहे.

आज जिल्ह्यात ७ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ८८८ झाली आहे. आज नोंद झालेल्या मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, कुडाळ २, मालवण १, वेंगुर्ले १, वैभववाडी १.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १२३, दोडामार्ग – २६, कणकवली – १७८, कुडाळ – १३८, मालवण – १५९, सावंतवाडी – १३१, वैभववाडी – ६१, वेंगुर्ले – ६८, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ४.
……..


१०२ वर्षांच्या आजीने करोनावर केली मात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचा विळखा वाढत असतानाच वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सुमती शिवराम घुगरे या १०२ वर्षांच्या आजीने करोनावर मात केली आहे. आठ दिवसांपूर्वी सुमती घुगरे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर वैभववाडीतील शासकीय दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती. ताप तसेच धाप लागणे, रक्तदाबाचा त्रास त्यांना जाणवू लागल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली. त्यात त्या पॉझिटिव्ह आल्या. वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार, डॉ. भानू मलिक, डॉ. शिवानी यांच्या पथकाने त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. सुमती घुगरे या एकशे दोन वर्षांच्या असताना देखील चांगल्या ठणठणीत आहेत. आजपर्यंत त्या सर्व शेतीतील व घरातील कामे करत असतात. त्या केव्हाही आजारी नसतात. त्यांच्या निरोगी शरीराने करोनावरदेखील यशस्वी मात केली आहे. ऐन उमेदीतील व्यक्तींनी करोनाचा धसका घेतलेला असताना या आजीबाईंनी मात्र करोनाला हद्दपार करून टाकले आहे. आजीच्या कुटुंबातील सर्वांनीच वैद्यकीय पथकाला धन्यवाद दिले आहेत.
………….

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply