सिंधुदुर्गात करोनाचे नवे ५४२ रुग्ण, ४५८ करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २३ जून रोजी करोनाचे नवे ५४२ रुग्ण आढळले, तर दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ४५४ आणि एकूण ३१ हजार ४७० रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात ६ हजार ४७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांदा तपासणी केलेल्या ८ जणांसह ५४२ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ६१, दोडामार्ग – ३३, कणकवली – ८२, कुडाळ – ८०, मालवण – ६३, सावंतवाडी – ९१, वैभववाडी – ३२, वेंगुर्ले – ९१, जिल्ह्याबाहेरील १. एकूण करोनाबाधितांची संख्या ३८ हजार ९२१ झाली आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ७५८, दोडामार्ग १८३, कणकवली ११४१, कुडाळ १५४७, मालवण १०६४, सावंतवाडी ६९९, वैभववाडी ३०१, वेंगुर्ले ७५४, जिल्ह्याबाहेरील रुग्ण २४. सक्रिय रुग्णांपैकी ३२४ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

आज जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९७४ झाली आहे. आज नोंद झालेल्या ६ मृतांसह इतर मृतांचा तपशील असा – कणकवली ५, कुडाळ २, वेंगुर्ले २.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड १३०, दोडामार्ग – २९, कणकवली – १९४, कुडाळ – १४८, मालवण – १८५, सावंतवाडी – १४१, वैभववाडी – ६६, वेंगुर्ले – ७५, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply